गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

1 min read

मुंबई दि.२९:- गणेशोत्सव काळात प्रशासना तर्फे केल्या जाणाऱ्या नियमांचे पालन करावे. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचणी येत असल्यास संपर्क साधावा असे आवाहन,पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे काल रविवारी केपीटीसीएल कार्यालयात माळ मारुती आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी, गणेशोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पडावा. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. आगामी काळात ज्या ठिकाणी समस्या आहेत तेथे पाहणी करून अडचणी दूर केल्या जातील अशी माहिती दिली. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, गणपती पाहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे उत्सव काळात गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत याची दखल घ्यावी अशी सूचना केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!