राज्याला आवश्यक खतांचा पुरवठा करण्याची केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना विनंती: खासदार जगदीश शेट्टर
1 min read
नवी दिल्ली दि.२९:- केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर,केंद्र सरकारने पुरवलेल्या खतांमधून १.६५ लाख मेट्रिक टन खते खरेदी करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खते आधीच राज्य सरकारला पुरवली आहेत.
कर्नाटकातील राज्य सरकारने ती योग्य पद्धतीने वापरण्याची गरज आहे. राज्यात खतांची मागणी अजूनही जास्त आहे आणि कर्नाटकला आवश्यक खते पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली आहे.
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी, आम्ही केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आवश्यक खतांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना,
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, पी सी गड्डीगौडर, रमेश जिगजीनगी, डॉ के. सुधाकर, कॅप्टन ब्रिजेश उपस्थित होते अशी माहिती खासदार शेट्टर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
