सह्याद्री व्हॅलीत सिडॅमॅक मेकाट्रॉनिक्स प्रा.लि.चा यशस्वी कॅंपस ड्राइव्ह- २३ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

राजुरी दि.२८:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी येथे सिडॅमॅक मेकाट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीचा कॅंपस ड्राइव्ह मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.या संधीचा लाभ घेत महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि वैयक्तिक मुलाखती अशा विविध स्तरांमधून गुणवत्ता तपासल्यानंतर एकूण २३ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. ही संस्था व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली.या कॅंपस ड्राइव्हसाठी सिडॅमॅकचे HR प्रकाश क्षीरसागर आणि त्यांची अनुभवी टीम विशेष उपस्थित होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महाविद्यालयाचे ट्रस्टी सचिन चव्हाण, उपप्राचार्य प्रा. पी. बालरामुडु, तसेच प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. मुरलीधर कुरकुटे यांचे विशेष योगदान लाभले. तसेच, सर्व विभागप्रमुख व शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन देत कॅंपस ड्राइव्ह यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांना महाविद्यालयाच्यावतीने त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!