जांबोटी-चोर्ला रस्त्यावर चिखले नजीक क्रेटा कार पलटी! सुदैवाने दोघेजण बचावले!
1 min read
बेळगाव दि.२८:- खानापूर जांबोटी-चोर्ला रस्त्यावर चिखले नजीक सोमवारी 21 जुलै रोजी गोव्याकडे जाणारी क्रेटा कार गाडी पलटी झाली व मोठा अपघात घडला आहे. मात्र, या अपघातात दोघेजण सुदैवाने बचावले.खानापूर तालुक्यातील जांबोटी-चोर्ला-गोवा मार्गावरून मोठ्या प्रमाणात एम शांड वाळूची वाहतूक होत असल्याने,
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून वाळू रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारी लहान मोठी वाहने रस्त्यावरून घसरत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वरचेवर अपघात होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.
अशा निष्काळजीपणामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.क्रेटा कार गाडी पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती परंतु नागरिकांनी कार बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली.
