शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेत संपवलं आयुष्य
1 min read
अहिल्यानगर दि.२८:- अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरात छताला दोर टांगून गळफास घेतला.
या घटनेमुळे शनि शिंगणापूरमध्ये खळबळ उडाली आहे. नितीन शेटे हे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे या परिसरात त्यांचा चेहरा अनेकांना परिचित होता. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर शनि शिंगणापूरमध्ये एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आहे. या घटनेमुळे शनि शिंगणापूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नितीन शेटे हे शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी होते.
त्यांचा सोमवारी सकाळी राहत्या घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं.
दरम्यान, शेटे यांच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे. त्यांनी आत्महत्या का केली? हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
