राजुरी गावामध्ये संकल्प व उम्मत की खिदमत फाउंडेशन, पुणे तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
1 min read
राजुरी दि.२८:- राजुरी गावामध्ये संकल्प बहुदेशीय युवा संस्था, उम्मत की खिदमत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव ( पुणे ) यांच्या मार्फत शालेय विध्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक यांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीर राजुरी गावामध्ये असणाऱ्या
विद्या विकास मंदिर या शाळेमध्ये संपन्न झाले. या निमित्ताने कार्यक्रमात आलेल्या सर्व पदाधिकारी व शिक्षक तसेच कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त आलेले डॉक्टर पांडुरंग टोमके, डॉक्टर. रवींद्र कानडे, डॉ. भाग्यश्री नागापूरकर, नामदेव पवार यांचे विशेष सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भागवत यांनी केले या कार्यक्रमानिमित्त अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गुलाम नबी शेख व त्यांचे संस्थेतील मित्रपरिवार व माण्यवर यांच्या उपस्थित संपन्न झाला. या निमित्त पंकज कणसे, दीपक आवटे, एम.डी घंगाळे,माऊली शेळके, शाकीर चौगुले, जि.के औटी, सरपंच प्रिया हाडवले,
हेमलता शिंदे, हसीना जमादार, इम्रान पटेल, कलीम पटेल, जब्बार पटेल, मुजमील पठाण, अब्दुल गणी पटेल, जब्बार इंनामदार, सिराज चौगुले, नजीर जमादार, खालिद पटेल, वसीम पटेल, जिलानी पटेल, आसिफ चौगुले,आदिल पटेल, अरिफ पटेल, डॉ. पंजाबराव कथे, डॉ. संदीप काकडे, डॉ. शिंदे यांनी व सर्व गावातील नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.
व हॆ शिबीर राजुरी गावामध्ये असणाऱ्या विद्या विकास मंदिर या शाळेत पार पडले. या वेळी जि. के औटी, पवार सर, गोपाळे सर, सहाणे सर यांनी सुद्धा शालेय विद्यार्थी यांची नेत्र तपासणी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन व नियोजन
संकल्प बहुदेशीय युवा संस्था चे मुख्य पर्वतक गुलाम नबी शेख यांनी केले. या निमित्ताने शिबिरात अनेक शिक्षक पालक वर्ग व विद्यार्थी वर्गाने बहुसंख्येणे नेत्र तपासणी केली. यानिमताने 300 ते 350 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
