सोलापूरात एक्सप्रेस ट्रेनची तिघांना धडक; दोघांचा जागीच मृत्यू; तिसरा गंभीर जखमी

1 min read

सोलापूर दि.२८:- सोलापूरातील माढा रेल्वे स्टेशनच्या सुमारे एक किलोमीटर अंतरावर रविवारी रेल्वे अपघाताची दुर्घटना घडली आहे. गोलघुमट एक्सप्रेसने तिघांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गोलघुमट एक्सप्रेस ही पंढरपूरहून सोलापूरकडे येत असताना ही घटना घडली. धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या जखमी व्यक्तीला तत्काळ मदत देत उद्यान एक्सप्रेसने सोलापूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून. याबाबत अधिक तपास सुरू आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!