आनंद भंडारी यांच्या शुभ हस्ते बेल्हे बीट मधील सर्व शाळांना 101 सोनचाफा वृक्षांचे वाटप
1 min read
आणे दि.२७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -१ शाळेत बेल्हे बीट (ता.जुन्नर) मधील सर्व शाळांना १०१ सोनचाफा वृक्षांचे वाटप जिल्हा परिषद अहिल्यानगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे शाळेचे माजी विद्यार्थी तसेच बेल्हे गावचे भूषण आनंद भंडारी यांची जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल बेल्हे गावातील सर्व प्राथमिक शिक्षक वृंदाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बेल्हे बीट मधील सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने भंडारी यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर एक शाळेसाठी आदर्श शाळा बांधकाम, ग्रंथालय याबाबतीत मोठे योगदान असल्याने शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रितम मुंजाळ,
उपाध्यक्ष वैशाली मटाले व सर्व सदस्य यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले. सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त करत साहेबांनी बेल्हे गावच्या विकासासाठी त्याचप्रमाणे शाळांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.याप्रसंगी बेल्हे गावचे आद्य नागरिक सरपंच मनीषा डावखर, जी .के औटी,
जानकु डावखर,स्वप्निल भंडारी , ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारी,मंदाकिनी नाईकवाडी कमल घोडे, कैलास औटी, दादाभाऊ मुलमुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन अशोक बांगर, विकास मटाले, हरिदास घोडे, संतोष साळुंके,
प्रभाकर गुंजाळ, सुलभा औटी, सुरेखा नवले, शंकर डुकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डुकरे यांनी केले व शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर व जानकु डावखर यांनी सर्वांचे मानले.
