निर्भया पथकाकडून विद्यार्थिनींना मार्गदर्शन
1 min read
आणे दि.२७:- आळेफाटा पोलीस स्टेशनचे महिला पोलीस हवालदार ज्योती दहिफळे यांनी बेल्हे येथील शाळेतील विद्यार्थिनींना निर्भया पथक बाबात महिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच मुलींसाठी वैयक्तिक तक्रारपेटी ठेवणे बाबत सांगितले, मुलींच्या स्वच्छता गृहासाठी महिला सफाई कामगार ठेवण्यास सांगितले.
मुलींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण देणेबाबत सूचना दिल्या मुलींच्या काही छेडछाड विषयी किंवा रोड रोमिया विषय काही तक्रारी असल्यास निर्भया पथक आळेफाटा यांची मदत घेण्याबाबत मार्गदर्शन केले. समर्थ गुरुकुल स्कूल बेल्हे तसेच डिसेंट फाउंडेशन पुणे याचा विद्यमाने कळी उमलताना या कार्यक्रमाचे शाळेतील मुलींसाठी नियोजन केले होते.
या वेळी त्या बोलत होत्या.तसेच मुलींची काही तक्रार असल्यास त्यांना डायल 112 टोल फ्री नंबर वर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी आपणास आळेफाटा निर्भया पथका मार्फत मदत देण्यात येईल असे सांगीतले. तसेच 5 ते 10 वी च्या मुलींना गुड टच बॅड टच बाबत प्रात्यक्षिक दाखवून दिले.
सोशल मीडिया संदर्भात मुलींनी मोबाईल किती वापरावा तसेच इंस्टाग्राम फेसबुक वर अनोळखीसमनची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नये त्यामधून आपल्या आयडी हॅक करून आपले फोटो तसेच आपली प्रायव्हेट माहिती हॅक केली जाऊ शकते याबाबत मुलींना मार्गदर्शन केले.अशी माहिती आळेफाटा पोलिस स्थानकाच्या महिला पोलीस हवालदार ज्योती दहिफळे यांनी दिली.
