जुन्नर तालुक्यात अत्याधुनिक पद्धतीने कोळपणी

1 min read

जुन्नर दि.२८:- जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी सोयाबिन खुरपनीसाठी आधुनिक पध्दतीच्या बळीराजा कोळप्याचा वापर करताणा दिसुन येत आहे.पावसाने सध्या उघड दिल्याने शेतक-यांणी आपल्या शेतात पेरलेल्या सोयाबिन, बाजरी, भुईमुग ही पिके खुरपनीसाठी आली दिसुन येत आहे. परंतु ही पिके खुरपनीसाठी महीला मजुर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर एक उपाय शेतक-यांणी काढला आहे.तो म्हणजे आधुनिक पध्दतीचे बळीराजा कोळपे चा वापर मोठया प्रमाणात करताणा दिसुन येत आहे. या आधुनिक पध्दतीचा फायदा मोठया प्रमाणात असुन हे कोळपे वापरण्यासाठी एकाच माणसाची गरज लागते. व एक माणुस हे कोळपे यंत्र वापर करत असताणा चार महीलांणा एका दिवसात प्रत्येकी तीनशे रूपये प्रमाणे बाराशे रूपये जाऊन हेच काम बळीराजा कोळप्याद्वारे काम केल्यास एका तासात चार महीलांचे काम दिवसभराचे काम करत आहे. ते दोन तासांत काम करत आहे. या कोळप्याची नवीन किंमत सुमारे पंधरा ते विस हजार रूपये असली तरी ते पाचशे रूपये एकरी दराने भाड्याने सुध्दा मिळत असुन मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाने या कोळपणी वापर करताणा दिसुन येत आहे. तसेच हया कोळप्याने शेतातील गवत चांगले निघत असुन झाडांणा चांगल्या प्रकारे माती टाकायचे काम हे कोळपे यत्र करत असल्याचे संपत चिंचवडे यांनी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!