बीडमध्ये तरूण डाँक्टरची इंजेक्शन घेवून आत्महत्या
1 min read
बीड दि.२७:- बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये तरुण डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुण डॉक्टर हा खासगी रुग्णालयात आरएमओ म्हणून कार्यरत होता. तरुण डॉक्टरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय ढवळे असे डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर ढवळे हा भूलतज्ञ म्हणून कार्यरत होता.
त्याने औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. डॉ. संजय ढवळेने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समोप आलेलं नाही. मात्र, तरुण डॉक्टरने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या डॉक्टरने आत्महत्या नेमकी का केली? हे अद्याप समोर आलेलं नाही. बीडचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
