मुख्यमंत्र्यानी “सातबारा कोरा”ची आश्वासनपुर्ती करावी:- राहुल ढेंबरे पाटील
1 min read
संगमनेर दि.२५:- शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी बोलताना सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आश्वासनाची पुर्तता करण्यास सरकार पुर्णपणे टाळाटाळ करत असुन.
तमाम महाराष्ट्रातील शेतकरी आज रस्त्यावर उतरले असून तात्काळ सातबारा कोरा करावा अन्यथा शेतकऱ्यांनी याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, शेतीमालाला हमीभाव, दिव्यांग बांधवांना मासिक ६०००/- रूपये पेंशन द्यावे.
तसेच राज्याचे कृषिमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांची थट्टा करणे तात्काळ थांबवावे आणि मोबाईलवरील जुगारापेक्षा एक दिवस तरी सर्वसामान्य शेतकऱ्याचे जीवन जगावे म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदना समजतील असा खोचक टोलाही लगावला.
