प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; चार आरोपी ताब्यात

1 min read

अहिल्यानगर दि.२१:- नगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घोडेगाव परिसरात वाहनांची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विश्वास रमेश पंडीत (वय २८), रोहन बाळासाहेब मोरे (वय २१), संदेश अनिल पेटारे (वय २१),सोपान पांडुरंग वाबळे (वय २७,(सर्व रा.भावी निमगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारे आरोपी वांबोरी फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!