भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले; कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून बाहेर काढलं; बाका प्रसंग टळला

1 min read

वसई दि.२०:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याबाबत आज भयानक प्रसंग घडला. प्रवीण दरेकर हे आमदार आहेत. ते विविध शासकीय आणि पक्षाच्या कामांसाठी विविध शहरांचा दौरा करतात. राज्यातील ते बडे नेते आहेत. त्यांच्या भूमिकेला राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. पण अशा बड्या नेत्यावर आज मोठा धक्कादायक प्रसंग ओढावला होता. पण कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे ते संकट दूर सारलं गेलं. प्रवीण दरेकर एका लिफ्टमध्ये अडकले होते. पण त्यांची सुखरुप लिफ्टमधून सुटका झाली असून ते ठीक असल्याची माहिती मिळत आहे.प्रवीण दरेकर वसईतील एका सभागृहाच्या लिफ्टमध्ये अडकले होते. कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून प्रवीण दरेकर यांना बाहेर काढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण दरेकर सुमारे 10 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून प्रवीण दरेकर यांना विचावलं आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकास मार्गदर्शन शिबिरासाठी आज वसईत आले होते. वसई पश्चिमेतील एका सभागृहात हा कार्यक्रम होता. प्रवीण दरेकर हॉलच्या इमारतीत आले तेव्हा ते लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात होते. त्या लिफ्टची क्षमता ही 10 जणांची होती. पण संबंधित लिफ्टमध्ये तब्बल 15 जण होती. त्यामुळे ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर जाण्याऐवजी तळमजल्यावर आली. लिफ्ट तळमजल्यावर आल्यानंतर अडकून पडली होती.लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर न जाता तळमजल्यावर आली आणि बंद पडून राहिली. यामुळे अचानक खळबळ उडाली. सगळेजण अस्वस्थ झाले. यावेळी कार्यकर्ते आणि प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षा रक्षकांनी लिफ्ट तोडून त्यांना बाहेर काढलं. प्रवीण दरेकर यांना बाहेर काढल्यानंतर ते प्रचंड घामाघूम झालेले बघायला मिळाले. त्यांनी बाहेर येताच पाणी पिलं. यानंतर ते तीन मजली चालत कार्यक्रमस्थळी गेले. सगळ्यांनी प्रसंगावधान साधल्यामुळे आज मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी या घटनेवर अद्याप तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!