वडगाव आनंद येथे घरफोडी करणारी टोळी आळेफाटा पोलिसांनी ५ दिवसांत केली अटक

1 min read

आळेफाटा दि.१९:- वडगाव आनंद या गावात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अवघ्या ५ दिवसांत मुसक्या आवळल्या.याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव आनंद (ता.जुन्नर) या ठिकाणी दि.५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चेतन रमेश चौगुले यांच्या घराचा अज्ञात चोरट्यांनी अनाधिकृतपणे खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार चोरी गेले होते तसेच त्यांचे जवळच राहणारे प्रशांत अनंत चौगुले यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरातील चांदीचे भांडी व रोख रक्कम असा एकुण २ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता असा दोन्ही घराचा मिळून एकुण ५ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद चेतन चौगुले व प्रशांत चौगुले यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली होती.सदर गुन्हयाचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या वतीने सुरू करण्यात आल्यानंतर एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने पोलिसांनी अतिशय चिकाटीने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीगार यांच्या सहाय्याने सदरचा गुन्हा हा करतेवेळी आरोपींनी पांढण्या रंगाच्या महिंद्रा पिकअपचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यामधील शिरूर (पुणे ) व नेवासा (अहिल्यानगर) येथून १) सोमनाथ भिमनाथ बामणे वय ३७ वर्षे रा. गुणवंतवाडी ता.गुनाट ता. शिरूर जि.पुणे, २) संदिप कैलास भालेराव वय २८ वर्षे रा. सुरेगाव (गंगा) ता. नेवासा जि. अहिल्यानगर, ३) संदिप बबन धोत्रे वय ३७ वर्षे रा. पोस्ट ऑफिस जवळ, न्हावरा ता. शिरूर जि.पुणे, ४) श्रीमंत जिवलाल चव्हाण वय ५२ वर्षे रा. देऊळगाव मोठ्या तलावाजवळ देऊळगाव सिध्दी ता. जि. अहिल्यानगर, ५) आकाश लकडया भोसले वय १९ वर्षे राहुकुम कॉलनी, पारधी वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ शिरूर जि. पुणे या आरोपींना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून त्यांनी गुन्हयात वापरलेली पिकअप एम.एच.१२ डब्लू‌ एक्स ८२०८ व गुन्हयात चोरी केलेली १८०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा एकूण १२ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.सदरची कामगिरी हि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.पुणे ग्रामीणचे अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे आळेफाटा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथकातील स.पो.नि. मोहिते, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, अनिल पवार, सहा. फौजदार दिपक साबळे, पो.हवा. अमित माळुंजे, पंकज पारखे, विनोद गायकवाड, राजु मोमीन, संदिप वारे, विक्रम तापकीर, पो.कॉ. नविन अरगडे, शैलेश वाघमारे, ओंकार खुणे, गणेश जगताप, अक्षय नवले, अमोल शेडगे, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, धीरज जाधव, वैभव सावंत यांनी केली आहे.फोटो – वडगाव आनंद (ता.जुन्नर) या गावात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक करून कारवाई करणारे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांचे पथक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!