पूनावाला फाउंडेशन तर्फे शालेय साहित्य किटचे वाटप
1 min read
पिंपळगाव दि.१९:- लीला पूनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ७४ विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक दादाभाऊ फापाळे यांनी दिली. या किटमध्ये दप्तर शूज, स्वेटर, रेनकोट, कंपासपेटी, रंगपेटी व वह्यांचा समावेश आहे.
फाउंडेशनच्या समन्वयक प्राजक्ता केवलराम मुख्याध्यापक फापाळे एल पीएफ विभाग प्रमुख निता आवटेयांच्या हस्ते हे किट वाटप झाले. यापूर्वी नववी व दहावीच्या ३० मुलींना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले होते. या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या प्रमुख कल्याणी नानजीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यालयातील सर्व शिक्षकांनी नियोजन केले. लीला पूनावाला फाउंडेशनच्या दत्तक शिष्यवृत्ती मुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास चांगल्या प्रकारे झाल्याचे मुख्याध्यापक फापाळे यांनी सांगितले. यासाठी फाऊंडेशन चे विश्वस्त फिरोज पूनावाला आणि अध्यक्षा लीला पूनावाला यांनी केलेले कार्य मोलाचे आहे.
