पिंपळगाव जोगा डावा कालव्यात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न २० वर्षांपासून प्रलंबित

1 min read

आणे दि.१९:- पिंपळगाव जोगा डावा कालवा हा गुळंचवाडी (ता.जुन्नर) पिंपळझाप येथुन गेला त्याला २० एक वर्ष झाली परंतू ज्या शेतकऱ्यांच्या शेतातुन गेला मायनर ३०/३१ मधिल शेकडो शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे भाऊसाहेब भांबेरे यांच्या नेत्रुत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे कलेक्टर व सिंचन भवन अधिक्षक अभियंता अलका अहीरवे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. चर्चेतून शेतकऱ्यांच्या रखडलेल्या मोबदल्याच्या कामास पुढच्या १५ दिवसांत गती देन्याचे अभियंता अलका अहिरवे यांनी सांगितले. या साठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भांबेरे यांनी चांगली चर्चा घडवुन आणली. या शिष्टमंडळात श्रद्धा पेपर एजन्सी मालक पांडूरंग संगमनेरकर, नामदेव येरंडे, नाथा बनकर, दत्त गवांदे, बाळू गुंजाळ सामिल होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!