अहिल्यानगर- कल्याण राष्ट्रीय महामार्ग यमदूत
1 min read
आळेफाटा दि.१८:- अहिल्यानगर- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर १ जानेवारी २४ ते १ जुलै २०२५ पर्यंत ३१ अपघातात २० जणांनी आपला जिव गमावला असुन ३० जण जखमी झालेले आहेत. त्यातच या महामार्गाचे काम चालु असल्याने वाहणे अनियंत्रित पणे चालवली जात असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.
अहिल्यानगर – कल्याण या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील आळेफाटा पोलीस ठाण्यात अंतर्गत (पेमदरा ते पिंपरी पेंढार) तीस किलोमीटर च्या अंतरात गेल्या दीड वर्षात २० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले त्यात २० जणांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. तर ११ किरकोळ अपघात झाले यात १९ जण जखमी झाले.
गंभीर व किरकोळ असे एकूण ३१ अपघात झाले त्यात २० मृत, ३० जखमी झाले.अशी माहिती क्राइम विभागाच्या रंजना मेचकर यांनी दिली. दरम्यान अहिल्यानगर हुन येताना जुन्नर तालुक्याच्या हद्दीमध्ये आल्यानंतर आणे घाट लागतो या घाटाच्या उताराला वाहणाचा वेग मोठ्या प्रमाणात असतो.
या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक ट्रक अंत्यविधी उरकुन चालत असलेल्या लोकांमध्ये घुसला होता व यामध्ये झालेल्या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच या मार्गावर अनेक वेळा अपघात होत आहे.त्यातच या मार्गावर सध्या रस्ता कॉक्रिटीकरण करण्याचे काम चालु आहे.
संबंधित ठेकेदाराने हे काम करत असताना एका बाजुचे काम चालु असताना दुस-या बाजुला वाहणे ये- जा करण्यासाठी रस्त्याचे तात्पुरते रूंदीकरण केले आहे त्याला पावसामुळे वारंवार खड्डे पडत आहेत.अनेक वेळा दोन्हीही बाजुची वाहने येत असल्याने नेहमीच ट्रॅफिक होत आहे. व वारंवार अपघात होत आहे.
त्यातच काही ठिकाणी एका बाजुचे काम झाल्यानंतर साईट पट्ट्या भरलेल्या नसल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने साईट पट्ट्या लवकरात लवकर भरण्यात यावे अशी मागणी वाहन चालकांकडुन होत आहे. काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता पूर्ण झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.
——–
प्रतिक्रिया
“वाहनचालकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नये. वाहन चालवताना धोकादायक पध्दतीने ओव्हरटेक करू नये तसेच रस्त्याच्या कडेला वाहनांना अडथळा होईल अशी वाहणे उभी करू नयेत.
तसेच चार चाकी वाहण चालकांनी सिल्ट बेल्टचा वापर करावा जे वाहण चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार नाहीत अश्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
विश्वास जाधव
पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस स्टेशन
फोटो – अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी गावच्या हद्दीत काम चालु असताना अरूंद रस्ता
