विद्यानिकेतन च्या नवगतांचे स्वागत
1 min read
साकोरी दि.१८:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी साकोरी (ता. जुन्नर) मध्ये नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ १ जुलै रोजी (Welcome Ceremony) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्युनिअर केजी, सीनियर केजी व इयत्ता पहिली मध्ये येणाऱ्या बालकांचे ट्रॅक्टर ट्रॉली सजवून त्यामधून त्यांची मिरवणूक काढून स्वागत केल्याची माहिती प्राचार्या रूपाली भालेराव यांनी दिली.
या कार्यक्रमाला पालकांनीही उपस्थिती दाखविली . यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन पी.एम हायस्कुल आणि पी.एम हायस्कुल चे प्राचार्या रमेश शेवाळे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा डुकरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या रूपाली भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचपुते अनिता, कदम रोहिणी, डेरे सुलभा, चासकर अंजली, काटे माया, दिपाली पोखरकर, दीपाली म्हस्के, हर्षदा भोर, विनोद उघडे यांनी केले.
