वीज चोरी बाबत हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा;एका वर्षात नव्वद हजार रुपयांची ४५४३ युनिट वीजचोरी
1 min read
शिक्रापूर दि.१८:- जातेगाव बुद्रुक ता. शिरुर सह चौफुला येथील एका हॉटेलमध्ये विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये लाखोंची वीजचोरी झाल्याचे उघड झाली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अंकुश मारुती उमाप तसेच हॉटेल बासरी गार्डनचे संचालक संतोष बाळासाहेब वाडेकर व धनंजय तुकाराम तोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) तसेच चौफुला येथील काही परिसरात विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाने अचानक छापे टाकत पाहणी केली असता जातेगाव बुद्रुक येथे अंकुश उमाप यांनी विजेच्या तारेवरून वीजचोरी करत एका वर्षात नव्वद हजार रुपयांची ४५४३ युनिट वीजचोरी केल्याचे आढळले.
तसेच यावेळी चौफुला येथील हॉटेल बासरी येथे छापा टाकला असता हॉटेलचालकांनी विजेच्या तारेवरून वीजचोरी करत दहा महिन्यात नव्वद हजार रुपयांची ३३२५ युनिट वीजचोरी केल्याचे दिसून आले. विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाने त्याबाबत पंचनामा केला असून
याबाबत विद्युत वितरण विभागाच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद नामदेवराव दुधाळे (वय ५४, रा. कल्याण मुंबई) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अंकुश मारुती उमाप
(रा. जातेगाव, ता. शिरुर) तसेच हॉटेल बासरी गार्डनचे संचालक संतोष बाळासाहेब वाडेकर व धनंजय तुकाराम तोडकर (दोघे रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
