बाळासाहेब जाधव कॉलेजच्या एन.सी.सी. ची प्रथम वर्ष भरती प्रक्रिया यशस्वी; ३० विद्यार्थांची निवड

1 min read

आळे दि.१८:- ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय , एन.सी. सी. २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन ची प्रथम वर्ष भरती प्रक्रिया कप्तान अधिकारी विपिन कुमार मल, सेना मेडल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आली. त्यांच्या समवेत सुभेदार प्रसन्नजीत देवनाथ, सी. एच. एम. अमोल बोऱ्हाडे, हवालदार मच्छिंद्र सावंत उपस्थित होते. सिनियर जी.सी. आय. नंदिता दास या देखील उपस्थित होत्या.एन.सी.सी. तर्फे विद्यार्थिनी साठी मिल्ट्री प्रशिक्षण मोफत दिले जाते. या प्रशिक्षणातून विद्यार्थिनी चा व्यक्तिमत्व विकास होतो. बी व सी सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर त्यांना सी. डी. एस., एस. एस.बी, अग्निवर, सेंट्रल पोलिस फोर्स साठी पात्र होता येते. महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या भरती प्रक्रिया साठी बोनस मार्क्स मिळविता येतात.या प्रसंगी विपिन कुमार,सेना मेडल कप्तान अधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवकांनी सेना अधिकारी, सी आर एफ,अग्निवीर या साठी तयारी करून भारतीय सैन्यात भरती होऊन देश सेवा करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी संस्थे चे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे यांनी कर्नल विपिन कुमार मल, सेना मेडल यांचे संस्थेचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले. या प्रसंगी मा. अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना युवकांनी देशसेवे साठी तत्पर असणे गरजेचे आहे, त्यासाठी एन सी सी मध्ये भाग घेऊन आपले, संस्था आणि महाविद्यालया चे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल करण्याचे आवाहन केले. किशोर कुऱ्हाडे विद्यमान संचालक यांच्या हस्ते सुबेदार मेजर तांदळे भाऊसाहेब यांचा सत्कार करण्यात आला.सम्राट कुऱ्हाडे यांच्या हस्ते सुबेदार प्रसंजित देवनाथ यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ प्रवीण जाधव यांनी महाविद्यालयात चालू असलेल्या एन सी सी विभाग आणि त्यांनी केलेले विविध सामाजिक सेवा, कार्यक्रम आदी माहिती उपस्थित अधिकारी वर्गास सांगितली आणि एन सी सी मुलींचे विशेष कौतुक केले. भविष्यात या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण आयोग-२०२० नुसार मिलिटरी चे विशेष शिबिर आपण राबवावे आणि विद्यार्थ्यांना देश प्रेम, देश सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंती त्यांनी सी. ओ . कर्नल विपिन कुमार मल सेना मेडल यांना या प्रसंगी केली. एन सी सी २ गर्ल्स च्या मेजर डॉ सुषमा कदम यांनी एन सी सी या मुलीं साठी, त्यांच्या भविष्यातील आर्मी करिअर साठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नल विपिन कुमार मल, सेना मेडल आणि प्राचार्य डॉ प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. त्यामुळे मुलींचा एन सी सी विभाग महाविद्यालयात अग्रगण्य स्थानी आहे. या प्रसंगी त्यांनी मिलिटरी ट्रेनिंग आजच्या तरुण पिढीला किती आणि कसे महत्वाचे आहे,या विषयी माहिती दिली आणि सर्वांचे आभार व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजन करण्यात प्रा संजय वाकचौरे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे , उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुळवले तसेच संचालक भाऊशेठ कु-हाडे, बबन सहाणे , उल्हास सहाणे, बाबु कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी एन सी सी तर्फे उपस्थित झालेल्या अधिकारी वर्गाचे मनापासून आभार व्यक्त केले आणि भविष्यात या विभागा कडून भारतीय सैन्यात भरती होणारे अधिकारी तयार व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करून, एन सी सी मुलींचे त्या करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २ गर्ल्स कॅडेट्स यांनी विशेष मेहनत घेतली. टेबल ड्रिल चा उत्कृष्ट नमुना सार्जंट चांदणी कुमारी, प्रीती कनोजिया, निकिता शिंदे आ,राध्य खुटाळ यांनी सादर केला. स्टिक ऑर्डरली प्रीती आणि गंगा यादव यांनी केले. सीनिअर अंडर ऑफिसर समीक्षा लामखडे हिने मुलींच्या संचालनाचे नेतृत्व केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!