मंगरूळ येथे उद्योजक पंकज कणसे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना टॅब भेट
1 min read
मंगरूळ दि.१८:- बेल्हा राजुरी जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व, उद्योजक पंकज कणसे यांच्याकडून मंगरूळ येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना टॅब भेट देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक पातळीचा विचार करत आणि डिजिटल युग लक्षात घेता
पंकज कणसे यांनी स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याप्रसंगी आमदार शरद सोनवणे युवा मंच चे सर्व कार्यकर्ते व मंगरूळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच मंगरूळ गावचे तमाशा कलावंत व स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव संजय महाडिक यांना बालगंधर्व पुरस्कार भेटला त्याबद्दल पंकज कणसे यांनी त्यांचा सन्मान केला व रोख अकरा हजार रुपये बक्षीस दिले.
