किल्ले शिवनेरीला जागतिक वारसा मानांकन मिळाल्याचा जुन्नरला जल्लोष

1 min read

जुन्नर दि.१३:- किल्ले शिवनेरीसह शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा मानांकन मिळाल्याचा जल्लोष शिवजन्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ढोल, ताशे आणि झांजपथकांच्या निनादात शिवजागर करण्यात आला.जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते शिवनेरीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आ. सोनवणे म्हणाले, या जागतिक मानांकनामुळे रयतेचं स्वराज्य मांडणाऱ्या राजाचा खऱ्या अर्थाने जगभरात जयजयकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी भक्तिधाम मंदिर येथे शनिवारी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार डॉ. सुनिल शेळके, 1 पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक 1 बाबासाहेब जंगले, सार्वजनिक 1 बांधकाम विभागाचे केशव जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, शिवाईदेवी ट्रस्ट आदी उपस्थित होते. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, युनेस्को नामांकन शिवनेरीला मिळाल्याची ही ऐतिहासिक घोषणा असून आता किल्ल्यांचे महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल. आता आपलीजबाबदारी वाढली आहे.दरम्यान गेली २५ वर्षे किल्ले शिवनेरीच्या संवर्धनात कार्यरत असलेल्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या शिलेदारांनी शिवजन्मस्थळी जाऊन शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!