श्रीराम विद्यालयाची सानवी कुरकुटे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिली

1 min read

पिंपळगाव दि.१३:- रयत शिक्षण संस्थेचे श्री राम विद्यालय पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) या विद्यालयाचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये 18 विद्यार्थी पात्र तर 8 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी. फापाळे यांनी दिली.‌‌ ते पुढे म्हणाले की, या परीक्षेसाठी 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी सानवी भरत कुरकुटे ही विद्यार्थिनी 300 पैकी 276 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत नववी तर जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने शिष्यवृत्ती धारक ठरली. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी कंसात गुण- सानवी भरत कुरकुटे (276) ऋतुजा अशोक पोखरकर (232), सिद्धी ठकसेन अरगडे (230), धनश्री सुनील पोखरकर (224), स्वरा तुळशीराम पोखरकर (220), स्मृती पंडित इंदोरे (220), दूर्वा विनोद पोखरकर (212), आर्या विकास बांगर (212) या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख जयकुमार पोखरकर (गणित), नीता आवटे (इंग्रजी), विजया लायगुडे (बुद्धिमत्ता), अर्चना आचार्य (मराठी) यांचे मार्गदर्शन मिळाले.‌यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!