बेल्ह्याच्या सपना वाघ ची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड

1 min read

बेल्हे दि.१३:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील हॉटेल व्यवसायिक शशिकांत वाघ यांची सुकन्या सपना वाघ हिची एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली. एप्रिल २०२३ रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून येत्या दोन महिन्यात नियुक्ती आदेश येऊन ती रुजू होईल. या आधी बीएमसी बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ही तिने यश संपादन केले होते. अशा प्रकारे दोन्ही परीक्षा तिने प्रथम प्रयत्नातच यशस्वीरित्या पूर्ण करून संपादन केले आहे. सपना ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील शेती व हॉटेल व्यवसाय करतात. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे यश पाहून सर्व बेल्हे नगरीतील ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले सपना हिने कृषी क्षेत्रात पदवी घेतलेली असून अभ्यासात असणाऱ्या सातत्य व मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. असे तिने सांगितले. तिच्या यशाच्या वाट्यात आई वडील कुटुंब नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांचा वाटा असल्याचे देखील तिने नमूद केले व आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!