निमगाव सावात ३४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

1 min read

निमगाव सावा दि.११:- येथे मोरया प्रतिष्ठाण व निमगाव सावा (ता.जुन्नर) ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर चंद्रशेखर बाणखेले यांच्या पुण्यतिथिनिमित्त मोफत सर्वरोगनिदान शिबीर , साहित्य वाटप व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती प्रतिष्ठाणचे संस्थापक किरण गोत्राळ यांनी दिली.या शिबीराचे आयोजन निमगाव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते. या शिबीरादरम्यान रक्तदान’, नेत्र तपासणी, डायबीटीज, स्त्रिरोग निदान, हाडांच्या समस्या, संसर्गजन्य आजार, कावीळ, रक्ताचे आजार, शुगर तपासणी, उच्च रक्तदाब, आदिंसारख्या अनेक आजारांच्या तपासण्या व उपचार तज्ञ डॉक्टरांद्वारे करण्यात आल्या. या शिबीराचे विशेष म्हणजे शिबीरात सहभागी ज्या रुग्णांना मोतीबिंदू किंवा इतर काही शस्त्रक्रीया करायची असेल अशा रुग्णांना शस्त्रक्रीया तर मोफत चं आहे परंतू पुण्याला जाण्या येण्यासाठी सुद्धा गाडीची मोफत व्यवस्था प्रतिष्ठाणच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने गरजुंना या शिबीराचा मोठा फायदा होत आहे. या शिबीराचे हे आठवे वर्ष आहे. या शिबीरात एकुण ११४० जणांनी नावनोंदणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला शिबीरात एकुण ३४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. २११ रुग्णांना चष्मे वाटप तर २५ रुग्णांना वॉकींग स्टीक मोफत देण्यात आल्या .शिबीरादरम्यान जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन मोरया प्रतिष्ठाणच्या या सामाजिक कामाचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!