वळसे पाटील महाविद्यालयात व्यासपौर्णिमे निमित्त विद्यार्थांना मार्गदर्शन

1 min read

निमगाव सावा दि.११:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे महाविद्यालयात गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे तसेच प्रमुख मान्यवर म्हणून गणपत घोडे गुरुजी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या अध्यात्मिक गुरु अथवा शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. तसेच संत नामदेव महाराज ,जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गुरुदेव दत्तात्रय इत्यादी संतांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा पुस्तक देऊन सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केले. त्यामध्ये कुमार साईनाथ गणेश कोयमहाले, कुमारी अनुष्का मच्छिंद्र अवचर व महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये प्रा. मंगल उनवणे, प्रा. माधुरी भोर प्रा. योगेश भालेराव यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी या विभागाच्या वतीने मूल्यशिक्षण उपक्रम अंतर्गत आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुपौर्णिमा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये गुरुपौर्णिमा व महर्षी व्यास या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक 1) गाडगे श्रावणी दीपक (SYBSC) 2) द्वितीय क्रमांक कोरडे विवेक संजय (SYBA) 3)तृतीय क्रमांक अवचार अनुष्का मच्छिंद्र (SYBSC) उत्तेजनार्थ क्रमांक साळवे निशा रवींद्र TYBCOMवक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक 1) अवचर अनुष्का मच्छिंद्र (एस वाय बीएस्सी) 2) द्वितीय क्रमांक कोयमहाले साईनाथ गणेश टी.वाय.बी. ए. 3)तृतीय क्रमांक गाडगे श्रावणी दीपक एस. वाय. बी. एस सी उत्तेजनार्थ क्रमांक गाडगे कुणाल शरद एस वाय बी कॉम.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रा. सुभाष घोडे, सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड, तसेच आभार प्रा. उत्तरा काटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखाप्रमुख प्रा. प्रवीण गोरडे, प्रा. अजय नन्नवरे, प्रा.चिराग कराळे, प्रा. ढोबळे, प्रा.कीर्ती टाव्हरे, प्रा.स्नेहल जाधव, प्रा.अमित साळवे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे माजी सचिव गणपत घोडे गुरुजी, संस्थाप्रतिनिधी कविता पवार यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!