पुष्पावती विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा

1 min read

डिंगोरे दि.११:- दरवर्षी ११ जुलै हा दिन जगभरामध्ये जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवी लोकसंख्येमुळे येणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या याविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, त्यावर विचार मंथन व्हावे. हाय यामागचा हेतू आहे.विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळवे यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त माहिती दिली. जर देशाची लोकसंख्या शिक्षण कौशल्याधिष्टीत झाली, त्यांचे आरोग्य उत्तम राहिले तर लोकसंख्या ही फक्त आकडेवारी न होता ती नैसर्गिक संसाधनाप्रमाणे देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी पोषक ठरेल. लोकसंख्यावाढी मुळे येणाऱ्या समस्या दूर होतील. 11 जुलै 1987 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने हा दिन साजरा करायला सुरुवात केली आहे. आजची जगाची लोकसंख्या आठशे कोटी झालेली आहे. लिंग असमानता,दारिद्र्य, अन्न, वस्त्र समस्या,माता बालक आरोग्य, रोगराई ,या समस्यांचे निराकरण करायचे असेल. तर लोकसंख्या योग्य प्रमाणामध्ये असणे सुद्धा आवश्यक आहे. अशा प्रकारची माहिती दिली. दत्तात्रय घोलप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षक प्रतिनिधी वैभव देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!