NCRDs न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम

1 min read

आंबेगाव दि.११:-NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेत ” महर्षी वेदव्यास मुनींच्या जयंती” निमित्त “गुरुपौर्णिमा” साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या अध्यापिका कल्पना राजगुरू यांनी भुषवले तथा उपशिक्षक प्रविण शिकारे, रसिका शिंदे यांनी व वैभवी पोंदे, कावेरी मुलमुले, रोशनी बो-र्हाडे, तंजीला चौगुले, संध्या दौंड, राधेय भागवत, आदित्य आरगडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केलेत. या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी केले. सुत्रसंचलन इयत्ता दहावी च्या विद्यार्थीनी सिध्दी गायकवाड व आदिती वाळुंज यांनी केले. प्रास्ताविक छाया वाघुंडे यांनी केले.आभारप्रदर्शन मुख्याध्यापक अनिल देसले यांनी केले.सर्व शिक्षक,शिक्षेकेत्तरांचा पेन भेटवस्तू देऊन इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.शाळेने सर्वांसाठी न्यूट्रिशन युक्त अल्पोपहार व्यवस्था केली. कार्यक्रमाचे निमित्ताने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला १० गुलाब फुलांचे रोपटे स्नेह भेट दिलेत. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थितांसाठी मिसळ पाव ची व्यवस्था केली होती. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयात ” सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ” उत्साहात संपन्न झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!