पावसाळ्यात सर्प दंशाच्या घटना दूर करण्यासाठी सर्प जनजागृती कार्यक्रम
1 min read
निमगाव सावा दि.७:- पावसाळ्यात सर्पदंशाचे (snake bite) प्रमाण वाढ असल्याने सर्पदंशाच्या भीतीनेच बहुतांश वेळा सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. जनमाणसात साप या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. त्यातून अंधश्रद्धेचा खूप मोठा प्रभाव असल्याने सापांची भीती वाटत असते.
त्यातूनच सापांच्या हत्या होतात. सापांविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी आषाढी एकादशी दिनी निमगाव सावा वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर यांच्या वतीने सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या आयोजनात मोरया प्रतिष्ठान आयोजित रक्तदान व महाआरोग्य शिबीर किरणभाऊ गोत्राळ
यांनी निमगावसावा याठिकाणी ठेवले होते. शेतकरी, नागरिक, इतर संस्थेचे अधिकारी या शिबिरात सहभाग नोंदवला. वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्थेचे संस्थापक आकाश माळी, सर्पमित्र दीपक माळी, सतीश घाडगे,नंदू खंदारे,यांनी अत्यंत सोप्या शैलीत सापांविषयीची माहिती शिबिरात आलेल्या शेतकऱ्यांना देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
नागरिकांडून अनेक विविध शंका कुशंकाचे निरसन केले. सापांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावेया दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी अनेक विविध अंधश्रद्धा पसरवल्या होत्या त्या मागील वैज्ञानिक कारणे विषद केली. साप आपला मित्र कसा, सापाला ओळखायचे कसे, विषारी – बिन विषारी सापांची वर्गवारी,
सर्पदंश टाळावा कसा, सर्प डूख धरतो की कसे, सर्पदंशावर वेळेवर उपचार किती गरजेचा आहे.याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. गारुडी, मांत्रिक, बुवा, बाबा कशा पद्धतीने गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवतात याबद्दल ‘देखील माहिती दिली.
भारतातल्या जवळपास सर्वच प्रजातींच्या सापांची चित्रपूर्ण माहिती प्रदर्शित करून शेतकऱ्यांच्या मनात साप हा निसर्गातील अविभाज्य घटक असून जीवन साखळीतील त्याचे अनन्य साधारण महत्त्व पटवून देष्याचा हेतू सफल झाल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाचे आयोजक सर्पमित्र आकाश माळी यांनी केले.
निमगाव सावा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आषाढी एकादशीच्या दिवशी विविध क्षेत्रातील अधिकारी, ग्रामस्थ, नागरिक, शेतकऱ्यांच्या सानिध्यात उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी होता. वन्यजीव संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर आणि जुन्नर तालुक्यातील अनेक सर्पमित्र या कार्यक्रमात उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष आकाश माळी, दीपक माळी, सतीश घाडगे, नंदू खंदारे यांचा श्रीफळ शाल देऊन गणेशभाऊ कवडे, मोरया प्रतिष्ठान जुन्नर तालुका चे अध्यक्ष किरण गोत्राळ यांकडून सत्कार सन्मान करण्यात आला आहे.
