‘सहयाद्री मित्र मंडळाने’ केलं वृक्षारोपण

1 min read

आणे दि.६:- उंचखडक (ता.जुन्नर) येथील सहयाद्री मित्र मंडळाने एकत्र येऊन उंचखडक येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं. यात प्रामुख्याने निसर्गाला उपयुक्त असलेली आयुर्वेदिक आणि दुर्मिळ असलेली झाडे लावण्यात आली. यामध्ये सप्तपर्णी,बहावा, कदंब, मोहगणी, बकुळ, वड, पिंपळ, कडुलिंब, ई. तसेच आंबा ,फणस, जांभूळ,चिंच यांसारखी फळझाडे आणि सुशोभीकरणासाठी चाफा, गुलमोहर, पेल्टापोरम ई. अशी एकूण तीस ते पस्तीस वेगवेगळ्या प्रकारची ७० झाडे लावण्यात आली. ही सर्व झाडे विकत आणण्यासाठी राजुरी, उंचखडक, आबाटेक, आळेफाटा आणि पुणे-मुंबई येथील सर्व निसर्गप्रेमींनी सढळ हाताने आर्थिक स्वरूपात मदत केली. तसेच झाडे लावण्यासाठी खड्डे घेण्यासाठी राजुरी येथील कॉन्ट्रॅक्टर निलेश हाडावळे यांनी जे. सी. बी. मशीनसाठी विनामूल्य सहकार्य केलं. त्याचप्रमाणे झाडांना शेणखत आणि ट्रॅक्टर ट्रॉली यासाठी सरपंच सुरेश.कणसे यांनी मदत केली.दहा ते बारा फूट उंच असलेली ही सर्व झाडे लोणावळा – कामशेत या ठिकाणाहून आणण्यात आली होती, त्यासाठी ओंकार कन्स्ट्रक्शन चे बाळकृष्ण दिघे यांनी स्वखर्चाने पिकअप गाडी उपलब्ध करून दिली.सहयाद्री सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून लावण्यात आलेल्या या सर्व झाडांचा भविष्यात निसर्गाला तसेच संपूर्ण गावाला अतिशय मोठ्या मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा वड, पिंपळ,गुलमोहर ई. जवळपास पंचेचाळीस झाडे लावण्यात आली होती. उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही सर्व झाडे शंभर टक्के जगवण्यात आली आहेत! याही वर्षी लावलेली झाडे जगवण्याचं आश्वासन कार्यकत्यांनी दिलेलं आहे. या वृक्षारोपण प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू कणसे व ग्रामस्थ राजेश कणसे, समीर कणसे, नितीन कणसे निलेश कणसे, शरद कणसे, गणेश कणसे, ओंकार आग्रे, कुमार कणसे, निखिल कणसे, अक्षय यादव, सुयोग कणसे, सागर ताजवे, सौरभ ताजवे आणि उंचखडक येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक- विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!