बांगरवाडीच्या प्रति पंढरपूरात लाखो भाविकांनी घेतले दर्शन; उद्योजक पंकज कणसे यांच्या हस्ते महापूजा

1 min read

बांगरवाडी दि.६ (वार्ताहर):- बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील प्रतिपंढरपुर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र गुप्त विठोबाचे मंदिर राज्यात प्रख्यात असून यंदा लाखो भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त दर्शनाचा लाभ घेतला. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांची गर्दी वाढली. सुमारे दोन ते तीन तास रांगेत उभे राहून भाविकांनी विठुरायाचे दर्शन घातले. पहाटे देवाची आरती आणि महापूजा सामाजिक कार्यकर्ते पंकज कणसे, उद्योजक भाऊसाहेब बांगर, प्रगतशील शेतकरी मधुकर कसाळ, गावातील नवदाम्पत्य मंगलेश बांगर या सर्वांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी रांगा मोकळ्या करण्यात आल्या असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष नकाजी बांगर यांनी सांगितले. सकाळी आठ वाजेपासूनच प्रसादासाठी ४ ते ५ टन खिचडी आणि ३०० डझन केळांचे वाटप मंडळाकडून करण्यात आले होते. पुणे व नगर जिल्ह्यातून तसेच आणे, गुळुंचवाडी, बेल्हे, साळवाडी, बांगरवाडी आणि आसपासच्या गावांमधून दिंड्यांचे आगमन झाले होते.दिंड्या आल्यानंतर दिंडी कोणताही अडथळा न येता गर्दीतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच हजारोंच्या संख्येने असणाऱ्या भाविकांच्या दर्शनाचे नियोजन मंडळाने व्यवस्थित रित्या केले होते. त्यामुळे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आळेफाटा येथील डॉ. शिवाजी खेमनर यांनी हजारो भाविकांची मोफत तपासणी करून औषध उपचार केले. रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते.गुप्त विठोबा देवस्थानच्या दर्शनासाठी राजुरी येथील वल्लभ शेळके मित्र परिवाराच्या वतीने आसपासच्या विविध गावांमधून हजारो भाविकांना मोफत बस सोय करण्यात आली होती. येथील निसर्ग रम्य वातावरण व गुप्त विठोबा देवस्थानचा महिमा यामुळे दिवसेंदिवस येथे भाविकांची संख्या वाढ झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!