वडगाव आनंद येथे दोन ठिकाणी चोरी;१० ते १२ लाख रुपयांचा ऐवज चोरीला

1 min read

आळेफाटा दि.६:- वडगाव आनंद या ठिकाणी सुमारे दहा ते बारा जणांनी दोन ठिकाणी चोरी करून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी व सव्वा लाख रुपये रोख रक्कम एकुन दहा ते बारा लाख रूपयांचा ऐवज चोरला. ही घटना शनिवार दि.५ मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी सुरवातीला वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील चौगुले मळ्यात रहात असलेले रमेश चौगुले यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोंडुन कपाटात असलेले सोन्याचे दागिने व ८० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर या चोरट्यांनी याच मळ्यात रहात असलेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत चौगुले यांच्या बंगल्याच्या पाठीमागील बाजुला असलेला दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करत आतमध्ये असलेले कपाटातील तीन ते साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व साडेतीन किलो चांदीच्या वस्तु व ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.घटना स्थळी पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी भेट दिली असुन झालेल्या चोरीचा तपास चालू केला आहे.दरम्यान आळेफाटा पोलीस स्टेशनचे हद्दीत गेल्या महिन्यात पिंपळवंडी ,काळवाडी,राजुरी या ठिकाणी चो- या झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पोलीस स्टेशन पासुन जवळच असलेल्या चौगुले मळ्यात दरोडा पडल्याने भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!