बेल्हे प्राथमिक शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन; चिमुकल्यांनी केला विठू नामाचा जयघोष
1 min read
बेल्हे दि.६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचा आयोजन केले होते.यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विठू नामाचा जयघोष केला.अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी, संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई अशा अनेक संतांची रूपे घेत दिंडीमध्ये सहभाग घेतला.
दिंडीनिमित्त शाळेमध्ये छोटासा रिंगण सोहळाही आयोजित करण्यात आला.या प्रसंगी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पीआय विश्वास जाधव, साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे व व्हाईस चेअरमन सावकार पिंगट, मोहन मटाले, जानकु डावकर, मनु भोरे, पोपट संभेराव इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहत दिंडी सोहळ्याचे कौतुक केले.
बालचमूंची दिंडी संपूर्ण गावातून जात असताना अनेक पालकांनी अगदी विद्यार्थीरुपी विठ्ठल रुक्मिणीची पूजा सुद्धा केली. अनेक विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेत टाळ्यांच्या गजरात ज्ञानोबा- तुकाराम असा जयघोष करत दिंडीमध्ये नवचैतन्य आणले.मुक्ताई मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी विसावा घेत विठ्ठलाचे छान अभंग गायले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी, सहभाग घेत फुगडीवर छान फेर धरला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले, मा.अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले यांनी याप्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे नियोजन केले. सदस्य ईश्वर पिंगट, स्वाती कोकणे,
गोरक्षनाथ शिरतर प्रज्ञा शर्मा,पायल सोनवणे, यांनी उपस्थित राहून दिंडीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.शाळेचे उपशिक्षक हरिदास घोडे, संतोष डुकरे कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रविणा नाईकवाडी योगिता जाधव, सुषमा गाडेकर,
अंजना चौरे यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले. मा.सदस्य मनीषा बांगर,शितल गुंजाळ,संदीप खोमणे यांचेही यासाठी सहकार्य लाभले.शालेय दिंडी सोहळ्याला सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी सर्व विद्यार्थी सहभागी पालक, ग्रामस्थ यांचे आभार मानले.
