गुंजाळवाडी शाळेच्या बालवारकऱ्यांची दिंडी; सरपंच नयना गुंजाळ यांनी दिल्या शुभेच्छा

1 min read

गुंजाळवाडी दि.६:- गुंजाळवाडी (बेल्हे) प्राथमिक शाळेच्या बालवारकऱ्यांचा दिंडी सोहळा शाळेने आयोजित केला होता.शिक्षकवृंद तुकाराम खोडदे व पाटीलबुवा खामकर यांनी दिडींचे छानसे नियोजन केले. या बालवारकऱ्यांसमवेत पालक, जेष्ठमंडळीदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. फुगडी तसेच टाळांचा गजर,अभंग,अन ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मुक्ताई मंदिरापासून सुरु झालेल्या दिंडीचे यादव परिवाराने छानसे स्वागत केले.या दिंडी सोहळ्यासाठी सरपंच नयना गुंजाळ यांनी शुभेच्छा दिल्या.या दिंडीसाठी ह.भ.प.काशिनाथ बोरचटे यांसकडून प्रसाद सौजन्य लाभले.शाळा व्यवस्थापन समितीतर्फे बालचमूंसाठी केळीचे वाटप करण्यात आले. नारायण बोरचटे यांनी बालकांसाठी मोफत गाडीचे सौजन्य दिले.या दिंडीत सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शाळा समिती सदस्य तसेच दिपिका बोरचटे,अनिता फापाळे, इंदुबाई नरवडे,हिराबाई वाघ,दत्ता यादव, सुदाम गोसावी, जिजाबाई फापाळे, वर्षा वाघ,रमेश गुंजाळ, जयसिंग पवार, मयुर तांबे, दिपाली बोरचटे, हिराबाई यादव, गणपत यादव, नारायण बोरचटे इत्यादींची उपस्थिती लाभली. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन बालचमूंचा आनंद द्विगुणित केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!