श्री क्षेत्र गुप्त विठोबा येथे जिल्हा परिषद इंदिरानगर शाळेची दिंडी
1 min read
बेल्हे दि.६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर बेल्हे या शाळेतील बालचमुंचा दिंडी सोहळा श्री क्षेत्र प्रति पंढरपूर गुप्त विठोबा बांगरवाडी बेल्हे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अंजुम शेख आणि पालक कोमल गोफणे यांची उपस्थिती लाभली. दिंडी मध्ये हसत खेळत भजन गाणी गप्पा गोष्टी खेळ घेण्यात आले. मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. बांगरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी केळी वाटप केले.
तर विलास पिंगट यांनी सर्व मुलांना राजगिरा लाडू चिक्की चे वाटप केले.सर्व दिंडी सोहळा आयोजन नियोजन मुख्याध्यापक निवृत्ती हाडवळे उपशिक्षिका पुष्पा साके यांनी केले.
