नगदवाडी शाळेत बाल दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन

1 min read

नगदवाडी दि.६:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली.या बाल दिंडी सोहळ्यात शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.दिंडी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक वारकरी वेशभूषा परिधान करून,गळ्यात टाळ घालून,डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीसह ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत व खांद्यावर भगव्या पताका घेऊन संपूर्ण गावातून फेरी मारली.दिंडी सोहळ्यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे,ग्रामपंचायत सदस्य निलेश बढे,ग्राम पंचायत अधिकारी रंजना रघतवान, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संगीताताई बढे, महेश बढे,रघुनाथ बढे, गणेश कुतळ, संतोष बढे,गुलाब बढे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवा उद्योजक संकेत अशोक बढे यांच्या वतीने सहभागी सर्व विद्यार्थ्यांना लाडू व केळीचे वाटप करण्यात आले. दिंडी सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. दिंडी सोहळ्याचे नियोजन मंगेश मेहेर, पंडित चौगुले, निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर व उज्वला पोटे यांनी केले.दिंडी सोहळ्याचा आनंद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!