कुकडी, घोड कालव्यातून आवर्तन सोडा; मंत्री विखे पाटील यांचे आदेश
1 min read
अहिल्यानगर दि.५:- कुकडीच्या डाव्या आणि घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीपासाठी आवर्तन सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा लाभ अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील गावांनां होणार आहे.
सद्य परिस्थितीत धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचा अंदाज घेऊन ओव्हर फ्लोचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना देण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी मंत्रालयात विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
सद्यपरिस्थितीत लाभक्षेत्रात अपेक्षे इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.
