पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

1 min read

पुणे दि.५:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.पदाधिकाऱ्याचे नाव, पद आणि कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे : जिल्हाप्रमुख : उल्हास शेवाळे (पुरंदर व बारामती), संजय काळे (इंदापूर व दौंड). जिल्हा संघटक :भरत ठाकूर (भोसरी). प्रभारी विधानसभा संपर्कप्रमुख : दिलीप बाम्हणे (आंबेगाव), विधानसभा संघटक : गणपत खापटे (खडकवासला विधानसभा).तालुकाप्रमुख : नितीन भालेराव (आंबेगाव), सदाशिव लकडे – दौंड (पश्चिम), शंकर शितोळे – दौंड (पूर्व). शहरप्रमुख :विनोद घुले (मंचर).

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!