जुन्नर शुगर लिमिटेड या डिस्टिलरी प्रकल्पाला राजुरी ग्रामस्थांचा तीव्र विरोध

1 min read

राजुरी दि.५:- राजुरी (ता. जुन्नर) येथे प्रस्तावित 300 KLPD केन सिरप/मोलॅसिस/धान्यावर आधारित जुन्नर शुगर लिमिटेड डिस्टिलरी प्रकल्पासाठी आज घेण्यात आलेल्या पर्यावरणीय जनसुनावणीत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असुन जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित साखर कारखान्यामुळे परिसरातील निसर्गसंपदा, कृषी अर्थव्यवस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, या प्रकल्पास तत्काळ पर्यावरणीय मंजुरी नाकारावी आजच्या सुनावणी ची माहिती योग्य पद्धतीने ग्रामपंचायत पर्यंत पोहोचली नाही ग्रामपंचायत लेखी नोटीस द्यावी व गावात दवंडीच्या माध्यमातून जागृती झाली नाही. अशी भावना व्यक्त करत बाळासाहेब औटी यांनी आजची सुनावणी रद्द करण्याची मागणी केली.या प्रसंगी माजी सभापती दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, एम.डी.घंगाळे, चंद्रकांत जाधव, सुरेश पाटील औटी, सुभाष औटी,प्रमोद औटी, भरत घंगाळे, लहू गुंजाळ, सुरेश बोरचटे मुरलीधर औटी, रमेश औटी, रामदास औटी, संजय पिंगळे, सुरेश औटी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी पत्रकारांशी बोलताना औटी म्हणाले की प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्यामुळे शेतीसाठी असलेला जलस्रोत प्रभावित होण्याची शक्यता असुन वाढती ऊस लागवड व त्याचा अन्नधान्य पिकांवरील परिणाम होणार आहे.तसेच सांडपाण्यामुळे भूजल व नद्यांचे प्रदूषण जैवविविधतेवर, विशेषतः पक्षी व वनस्पती प्रजातींवर प्रतिकूल परिणाम होणार आहे व स्फोटक व ज्वलनशील पदार्थांमुळे संभाव्य अपघाताचा धोका असल्याचे सांगितले.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित सुनावणीस अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवतडे, तहसीलदार डॉ. सुनील शेळके आदी अधिकारी उपस्थित होते. मात्र, सुनावणीपूर्वी स्थानिक ग्रामपंचायतींना वेळेवर लेखी सूचना न देण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला.तत्पूर्वी, परिसरातील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी केली. “प्रकल्प हटाव, पर्यावरण वाचवा”, “शेतकऱ्यांना संपवणारा कारखाना नकोच!” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!