आपला भाऊ फाऊंडेशन व शिव आधार संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

1 min read

जुन्नर दि.२९:- आपला भाऊ फाऊंडेशन व शिव आधार संस्थेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना “वह्या वाटप उपक्रमाची” सुरुवात करण्यात आली असल्याचे या भागातील युवा नेतृत्व अजिंक्य घोलप यांनी सांगितले. आदिवासी विभागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.घोलप यांनी यापूर्वी स्वतः आणि विविध संस्थांच्या माध्यमातून शालेय साहित्य,स्टडी टेबल्स, स्कुल बॅग,पुस्तके वाटप केले असून या भागात शिक्षणाच्या पायाभूत व भौतिक सुविधांसाठी ते नेहमी अग्रेसरपने काम करत असतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!