बालविवाह प्रकरणी अल्पवयीन युवतीच्या प्रसूतीनंतर गुन्हा दाखल; पाच जणांवर गुन्हा दाखल; नवरदेव अटकेत

1 min read

शिक्रापूर दि.२९:- जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे डिसेंबर २०२३ मध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह केल्याची खळबळजनक घटना युवतीच्या प्रसूतीनंतर समोर आली. शिक्रापूर पोलिसांत अल्पवयीन युवतीच्या पती, सासू, सासरे, आई, वडिल अशा पाच जणांवर तब्बल दीड वर्षांनी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी युवतीच्या नवरदेव पतीला अटक केली.आनंदा प्रकास डहाळे (वय २६, रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर), असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक येथील एका दाम्पत्याने एका अल्पवयीन युवतीच्या आई वडिलांच्या मदतीने आपल्या मुलाचा विवाह केला. नंतर अल्पवयीन युवती गरोदर राहून युवतीने बाळाला जन्म दिल्याने युवती अल्पवयीन असल्याचे उघड झाल्याने रुग्णालयाने याबाबतची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती घेत अल्पवयीन युवतीचा पती आनंदा प्रकाश डहाळे, सासू भाग्यश्री प्रकाश डहाळे, सासरे प्रकाश डहाळे (तिघे रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरुर) व आई सुजल गजानन खर्डे, वडील गजानन भीमराव खर्डे (रा. डोंगरगाव, ता. लोहा, जि. नांदेड) यांच्या विरुद्ध बालविवाह व बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे केले आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस नाईक प्रताप कांबळे यांनी नवरदेव पती डहाळे याला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!