सांगलीच्या ऊस पंढरीतून ‘विघ्नहर’च्या तज्ञ संचालकाचा सन्मान

1 min read

पारगाव तर्फे आळे दि.२९:- विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी नुकतीच नेमणूक झालेल्या युवा कृषी पदवीधर व ऊस शेतीतील नावाजलेल्या मार्गदर्शक विकास चव्हाण यांचा सांगलीच्या ऊस पंढरीतील नामवंत शेतकऱ्यांकडून त्यांच्या निवासस्थानी विशेष सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ऊस भूषण पुरस्कार असे अनेक मानकरी सन्मान प्राप्त केलेले सांगलीतील अमोल लेकसर आणि त्यांच्या 100 टन एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी समूहाने हा गौरव सोहळा आयोजित केला होता.सांगली ते पारगाव असा प्रवास करून आलेल्या शेतकऱ्यांनी ‘ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तज्ञ संचालकपदी झालेला सन्मान’ ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.विकास चव्हाण यांचा ऊस शेतीतील यशस्वी प्रवास : चव्हाण यांनी आजवर ऊस उत्पादनात अनेक विक्रम नोंदवले आहेत. एकरी 126 मे टन प्रति एकर उत्पादन,एकरी 110 मे टन खोडवा उत्पादन तसेच विविध शेतकरी मेळावे, चर्चासत्रे आणि वैयक्तिक शेतकरी भेटींच्या माध्यमातून ऊस उत्पादनात सातत्याने नवे प्रयोग व मार्गदर्शन त्यांनी केले आहे.विघ्नहर कारखान्यातील योगदान : चव्हाण यांच्या पुढाकारातून ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन चळवळ, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार, आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांची अंमलबजावणी झाली आहे. यासाठी त्यांना आजवर ५० हून अधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन जाणणार!
यावेळी आपली भावना व्यक्त करताना विकास चव्हाण म्हणाले, “या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून शेतकऱ्यांच्या अडचणी आता मी स्वतः त्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेणार आहे. केवळ कार्यालयात बसून निर्णय न घेता, शेतकऱ्यांच्या वास्तवातील अडचणी कमिटीसमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळाने एका कार्यकर्त्या शेतकऱ्याची तज्ञ संचालकपदी निवड केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे, आणि सांगलीच्या ऊस पंढरीतील शेतकऱ्यांनी दिलेला हा सन्मान त्या कौतुकात भर टाकणारा ठरला आहे. विकास चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव पारगाव, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी विकास हरिभाऊ चव्हाण यांची निवड झाल्यानंतर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऊस क्षेत्रातील खराखुरा तज्ञ म्हणून ओळख असलेल्या विकास चव्हाण यांची निवड केल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे आभार मानले जात आहेत.विकास यांचे गाव स्मार्ट व्हिलेज पारगाव यांच्या गावातील पारगाव तर्फे आळे विविध कार्यकारी सेवा सोसायटी, पारगाव तर्फळे फार्मर प्रोड्युसर कंपनी, स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत पारगाव, मंगरूळ ग्रामपंचायत सरपंच तारा ताई लामखडे व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके, शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या चंदा गाडगे, माऊली खंडागळे, कृषी विभाग यांसह मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे माजी ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन सन्मान केला. विकास चव्हाण यांच्या कार्याची ही खऱ्या अर्थाने पावती असल्याचे सर्व स्तरातून प्रतिपादन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!