मॉडर्न इंग्लिश स्कूल च्या चिमुकल्यांनी अनुभवला फळांचा दिवस
1 min read
बेल्हे दि.२९:- मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे (ता.जुन्नर) येथे केजी च्या विद्यार्थ्यांना फळांची ओळख, रंग, चव तसेच फळांचे दैनंदिन आहारातील महत्त्व व फायदे समजावून सांगण्यासाठी एक दिवस फळांचा अशा आगळ्यावेगळ्या दिवसाचे आयोजन करण्यात आले.
सर्व चिमुकले आंबा, कलिंगड, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, सफरचंद, अननस अशा वेगवेगळ्या फळांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. विद्यार्थ्यांसाठी विविध फळांविषयी माहिती सांगणारी खेळ गाणी यांचे देखील आयोजन करण्यात आले. लहान वयापासूनच फळांविषयी आवड निर्माण होणे.
आरोग्यपूर्ण आहारासाठी फळांचे महत्त्व समजणे व मुलांना विविध फळांची ओळख होणे अशा सकारात्मक सवयींसाठी एक दिवस फळांचा आयोजित केल्याचे प्राचार्या विद्या घाडगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आणलेल्या वेगवेगळ्या फळांची चव चाखून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी सर्वच पालकांचे सहकार्य लाभले.या वेळी विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
