जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह धरण तहानलेलेच
1 min read
जुन्नर दि.२९:- जुन्नर तालुक्यात एकूण ५ धरणे असून पिंपळगाव जोगा,माणिकडोह धरणात सध्या अल्प जलसाठा असल्याने ही धरणे तहानलेलेच आहेत. तर येडगाव व वडज धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा असून चिल्हेवाडी धरणात ७७ टक्के पेक्षा जास्त साठा आहे.
कुकडी पाटबंधारे विभागामध्ये शनिवार दि. २८ पर्यंत वडज धरण ५४.९५ टक्के, डिंबे ३६.६३ टक्के भरले आहे. तर येडगाव धरण ५७.६० %, माणिकडोह १३.५१ टक्के, पिंपळगाव जोगे – १.९१ टक्के, विसापूर ९१.३७ टक्के, चिल्हेवाडी ७७.६२ टक्के तर घोड धरण ८२.१० टक्के भरले आहे.
तालुक्यात मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व भागात यंदा मे व जून च्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. आणे पठार, बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, राजुरी, साकोरी, तांबेवाडी, बोरी, आळे, पारगाव, मंगरुळ, बांगरवाडी,
यांस तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. जून महिन्यात पावसाने उघड दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. तर काही भागांमध्ये पेरलेली पीक उगवून देखील आले आहे. पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने जुन्नर तालुक्यात दडी मारली असून शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
प्रतिक्रिया
“गेल्यावर्षीच्या तुलनेत पिंपळगाव जोगा धरणाची परिस्थिती चांगली आहे. यंदा पाण्याचे नियोजन चांगले झाले. तसेच पावसाने साथ दिल्याने पिंपळगाव जोगा धरणातून कुकडी डावा कालवा साठी १ टीएमसी पाणी सोडले.”
प्रशांत कडुस्कर
कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे
