वडिलांच्या स्मरणार्थ शालेय श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल च्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य भेट

1 min read

रानमळा दि.२८:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (बेल्हे) येथे कै.भागाजी विठोबा गुंजाळ यांच्या स्मरणार्थ दिलीप भागाजी गुंजाळ, राहणार गुळंचवाडी (वसंत ॲग्रो कंपनीचे मालक, अकोले) यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 60 वह्या, 100 पेन व 10 कंपास भेट दिल्या. त्यानिमित्ताने विद्यालयातील मुख्याध्यापक सुदाम जगताप यांनी शाल व श्रीफळ देऊन दिलीप गुंजाळ यांचा सत्कार केला व विद्यालयातर्फे त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!