स्व.आमदार वल्लभ बेनके यांच्या जयंती निमित्त खामगावात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
1 min read
खामगाव दि.२९:- जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते स्व.आमदार वल्लभ बेनके यांच्या जयंती निमित्ताने खामगाव येथे मोहन ठुसे नेत्र रुग्णालय यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
गाव व वाड्या वस्त्यांवरील ८० हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.या मध्ये आवश्यकतेनुसार रुग्णांच्या शस्त्रक्रिया तर काहींना चष्मे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच विविध शिबीरे आयोजित करून गाव पातळीवर त्यांना उपचार देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आदिवासी गावात विविध गावांमध्ये शिबीराचे आयोजन केले आहे.या शिबीर आयोजन करण्यात आमदार अतुल बेनके युवा मंच,आपला भाऊ फाऊंडेशन,ललितभाऊ जोशी स्पोर्ट क्लब,आरोग्य उपकेंद्र खामगाव आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
