काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पकडला

1 min read

अहिल्यानगर दि.२८:- रेशनिंगचा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ४०० गोण्याच्या तांदळासह ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुंदर बबन घुमरे (वय ६०, रा. लोणी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर),असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता योगेश मोहन भंडारी, (रा.जामखेड, ता.जामखेड (पसार) याच्या दुकानामधुन घेतला आहे. हा तांदूळ विक्रीसाठी सांगली येथे घेऊन जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जामखेड-करमाळा रस्त्यावर ट्र्कमधून रेशनिंगच्या तांदळाची विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!