गाडीत 9 Airbag, पण 1 चुक पडली महागात; दीड कोटींची कार ही वाचवू शकली नाही नाशिकच्या बिझनेसमॅनचे प्राण

1 min read

नाशिक दि.२८:- कधी कधी अपघातात काही तांत्रिक बिघाड किंवा एक छोटीशी चूक जिवावर बेतू शकते. असाच एक हृदयद्रावक अपघात नाशिकजवळील समृद्धी महामार्गावर घडला आणि एका नामवंत उद्योजकाचा जीव गेला.नाशिकचे प्रसिद्ध उद्योगपती सुनील हेक्रे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते त्यांच्या कुटुंबासह मुंबईहून नाशिककडे परत येत होते. प्रवासासाठी वापरलेली कार ही सुमारे 1.5 कोटींची Mercedes GLS 400D SUV, जी 9 एअरबॅग्स, ADAS (Advanced Driver Assistance Systems) आणि सर्व आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज होती.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गाडी सुनील हेक्रे यांचा मुलगा चालवत होता. शहापूरजवळ पावसामुळे महामार्गावर पाणी साचले होते. समोरून आलेल्या एका भरधाव वाहनामुळे त्यांच्या गाडीच्या समोरील काचेवर मोठ्याप्रमाणात पाणी आलं आणि त्यांना समोरचं दिसणं बंद झालं. हे सगळं घडत असताना कारचा वेग खूप जास्त होता. त्यामुळे गाडी चालवणाऱ्याचा गाडीवरील नियंत्रण सुटला आणि SUV स्किड होऊन उलटली, विरुद्ध मार्गावरील जाऊन रेलिंगला धडकली.सर्व एअरबॅग्ज बाहेर आल्या, त्यांनी आपलं काम देखील केलं पण सुनील हेक्रे यांच्या एका चुकीमुळे त्यांना एअर बॅग्स देखील वाचवू शकल्या नाहीत. त्यांनी खरंतर गडबडीत सीट बेल्ट लावलं नव्हतं. ज्यामुळे गाडीने पलटी मारताच सुनील हेक्रे गाडीतून बाहेर फेकले गेले आणि जबरदस्त मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्यात त्यांची बायको आणि दोन मुलांचे प्राण वाचले आहेत, पण ते गंभीर जखमी आहेत. त्यांचा मुलगा सध्या अत्यवस्थ स्थितीत आहे.या अपघातानंतर नाशिकमधील औद्योगिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. हेक्रे हे एक प्रगतिशील, उदार आणि कष्टाळू उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने अनेक उद्योगजगतातील मंडळींनी दुःख व्यक्त केलं आहे.पण या घटनेनं पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं आहे. शिवाय सीट बेल्टचं महत्व देखील दाखवून दिलं आहे. अत्याधुनिक मार्ग असूनही साचलेलं पाणी, कमकुवत पाटबंधारे यंत्रणा, आणि अदृश्य साईनबोर्ड यामुळे हा महामार्ग अपघातप्रवण ठरत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!