राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक:- दादा भुसे

1 min read

मुंबई दि.२८:- राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा बंधनकारक नसून हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक असतील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यात तृतीय भाषा म्हणून कोणतीही भाषा बंधनकारक नाही.असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह,राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!